गोवा खबर : कला आणि संस्कृती खात्यातर्फे राज्यात 12 वेगवेगळ्या तालुक्यांच्या ठिकाणी धालो-फुगडी 2024-25 महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
इच्छुक गटांनी कार्यालयातून विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज कला आणि संस्कृती खाते, संस्कृती भवन, पाटो पणजी, रवींद्र भवन येथून कार्यालयीन वेळेत मिळवावे. तसेच संकेतस्थळावरही अर्ज उपलब्ध असतील, असे कळवण्यात आले आहे. वरील पत्त्यावर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर अशी आहे. कोणत्याही स्पॉट एंट्री स्वीकारल्या जाणार नसल्याचे कळवण्यात आले आहे.