गोवा खबर

इफ्फी महोत्सव कार्यक्रम भागात जमावबंदीचा आदेश

Published

on

Spread the love

गोवा खबर : उत्तर गोवा जिल्हान्यायदंडाधिकार्‍यांनी गोव्यात होणार्‍या 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इफ्फीचे कार्यक्रम होणार्‍या पणजी आणि आगशी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील स्थळांपासून सभोवतालच्या 500 मीटर भागातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गल्ली, रस्ता, चौक किंवा कोणत्याही खुल्या जागेत पाच किंवा अधिक व्यक्ती जमा होण्यास आणि मिरवणूक काढण्यास किंवा आयोजित करण्यास, पिस्तुले किंवा लाठी, तलवारी, भाले किंवा सुरा यासारखी शस्त्रे जवळ बाळगण्यास, लाऊडस्पिकरचा वापर करण्यास, घोषणा देण्यास आणि फटाके लावण्यास बंदी लागू केली आहे.

कामावरील लोकसेवक, परवानगी असलेले लग्नसोहळे, अंतविधी किंवा कोणताही खास प्रसंग किंवा जिल्हा न्यायदंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी, उपविभागीय न्यायदंडाधिकार्‍यांच्या मताप्रमाणे विश्वसनीय प्रसंग ज्यांना संबंधित जिल्हा न्यायदंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी किंवा उपविभागिय न्यायदंडाधिकार्‍यांकडून पूर्व लेखी परवानगी घेतली आहे, त्यांना ही बंदी लागू नाही. हा आदेश 28 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार.

आयनॉक्समागील रस्ता वाहतुकीस तात्पुरता बंद

इफ्फीच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांनी आयनॉक्स लेन (जर्नल बॅनॉर्ड गुएडेस रस्ता) म्हणजे आयनॉक्स संकुलाबाजूचा पणजी मार्केट ते डी. बी. बी. मार्गपर्यंतचा रस्ता 30 नोव्हेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्याचप्रमाणे रस्ता बंद असल्याचे सूचना फलकही उभारण्याचे आदेश दिले आहेत.

Trending

Exit mobile version