गोवा खबर : क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाने १९नोव्हेंबर रोजी फोंडा केंद्रात तिरंदाजी आणि कबड्डीमधील मुले व मुलींची निवड करण्यासाठी दुपारी ३.००वाजता आणि कबड्डी व व्हॉलीबॉलमधील मुले व मुलींची निवड चाचणी २०नोव्हेंबर २०२४रोजी सांखळी केंद्रावर होणार आहे. डे बोर्डिंग आधारावर त्यांना प्रशिक्षण दिले जाईल.
आजूबाजूच्या १०ते १५वयोगटातील (मुले आणि मुली) इच्छुक बोनाफाईड विद्यार्थ्यांना या चाचण्यांमध्ये भाग घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
इच्छुक खेळाडूंनी योग्य क्रीडा किटसह आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र आणि शालेय क्रीडा कार्डाची प्रत सोबत घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कबड्डी आणि तिरंदाजीची आवड असलेल्यांनी १९नोव्हेंबर २०२४रोजी दुपारी ३.००वाजता फोंडा क्रीडा संकुलात एपीईओ पांडुरंग नाईक मो.क्र. ८८३०६८१५८८ वर संपर्क साधावा.
कबड्डी आणि व्हॉलीबॉलमध्ये स्वारस्य असलेल्यांनी २०नोव्हेंबर २०२४रोजी दुपारी ३.३०वाजता पर्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सात्तरी येथे टीएसओ राजू पवार, मो.क्र. ८४०८०९१०६९ वर संपर्क साधावा.