गोवा खबर

हिंदू राष्ट्र समन्वय समितीने उलगडला ‘गोवा इन्क्विझिशन’चा इतिहास

Published

on

Spread the love

गोवा खबर : हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने बोर्डे, डिचोली येथील रवळनाथ सभागृह येथे नुकतेच एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून ‘गोवा इन्क्विझिशन’चा इतिहास उलगडण्यात आला.

या कार्यक्रमाद्वारे ‘गोवा इन्क्विझिशन’च्या माध्यमातून गोमंतकियांवर करण्यात आलेल्या अत्याचाराचा स्मृतींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाला  शिवप्रेमी तथा इतिहासतज्ञ सचिन मदगे आणि मुकुंद कवठणकर यांची उपस्थिती होती.

कवठणकर यांनी ‘गोवा इन्क्विझिशन’चा विषय कार्यक्रमात घेण्यामागील कारण स्पष्ट केले. मदगे म्हणाले,‘‘ ऐतिहासिक पुरावे, दस्तऐवज आणि त्या काळातील परिस्थिती यांचा अभ्यास केल्यास त्या काळी हिंदूंवर झालेल्या अन्यायाची माहिती मिळू शकते. छत्रपती संभाजी महाराज यांनी खर्‍या अर्थाने पोर्तुगीज विरोधातील लढाई जिंकली होती. या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या पराक्रमामुळे आपण ‘शंभू प्रताप दिन’ साजरा केला पाहिजे’’.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गोविंद चोडणकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्तावना मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वझे यांनी केले.

Trending

Exit mobile version