गोवा खबर

इफ्फी महोत्सव काळात वाहतूक व्यवस्था

Published

on

Spread the love

गोवा खबर :  ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आणि समारोप समारंभ डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार आहे. उत्सवाच्या कालावधीत वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी २० नोव्हेंबर रोजी इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यास आणि २८ नोव्हेंबर रोजी समारोप सोहळ्यास डॉ. शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे उपस्थित राहणाऱ्यांसाठी आणि उत्तर आणि दक्षिण गोव्यातून (पणजी वगळता) येणाऱ्या लोकांनी राष्ट्रीय महामार्ग ६६ मार्गे येणाऱ्या बांबोळी जीएमसीकडे पोहोचल्यावर गोवा विद्यापीठाचा रस्ता धरून कार्यक्रमाच्या ठिकाणी यावे. पणजीहून येणाऱ्यांनी ताळगाव किंवा दोनापावला मार्गे कार्यक्रमाच्या ठिकाणी यावे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  आयनॉक्स लेन (जर्नल बॅर्नार्ड गुएडेस रस्ता) म्हणजे आयनॉक्स संकुलां बाजुचा पणजी मार्केट ते डी.बी.बी. मार्ग पर्यंत जाणारा रस्ता ९ दिवसपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी तात्पुरता बंद असेल. आयनॉक्स पार्किंग जागेसाठी ईएसजीच्यावतीने पासेस जारी करण्यात येतील. आरोग्य सेवा संचालनालय, कला अकादमी आणि एसएजी मैदानावर पार्किंगची व्यवस्था असेल.

Trending

Exit mobile version