गोवा खबर

गोवा विद्यापीठातर्फे प्रकल्प सहाय्यक पदांसाठी अर्ज आमंत्रित

Published

on

Spread the love

गोवा खबर : इंटेग्रेटिंग थेराप्युटिक इंडेजिनस कुजीन्स, व्हेलनेस प्रोग्राम आणि फिलोझोफिकल काऊंसेलिंग फोर सस्टेनेबल आणि होलिस्टिक टुरिझम इन गोवास हिंटरलेंड – व्हिजन फोर डिव्हेलॉप्ड इंडिया 2047 या विषयावरील संशोधन प्रकल्पावर काम करण्यास दोन प्रकल्प साहाय्यक पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.
उमेदवारांकडे कमीत कमी 55 टक्के गुणांसह कोणत्याही समाजशास्त्रातील पदव्युत्तर पात्रता असली पाहिजे. दरमहा 20 हजार रुपये असेल.

प्रकल्पाचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. उमेदवारास गोव्याच्या ग्रामीण भागात जाऊन लोकांकडून घरगुती औषधोपचार आणि पाकशास्त्राविषयी माहिती एकत्र करावी लागेल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सीव्ही आणि आवश्यक दाखल्यांसह तत्वज्ञान अभ्यासक डॉ. वॉल्टर मिनेझिस, संस्कृत तत्वज्ञान विभाग यांना email: menezes@unigoa.ac.in वर पाठवावे. मुलाखत 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता संस्कृत तत्त्वज्ञान विभाग, गोवा विद्यापीठ येथे होईल. उमेदवारांनी मुलाखतीला येताना आपले मुळ दाखले सोबत आणावे.

Trending

Exit mobile version