गोवा खबर

राज्यपालांकडून गुरू नानक जयंतीदिनाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना, विशेषतः शीख बांधवांना गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

राज्यपाल म्हणतात, आम्ही शीख धर्माचे संस्थापक आणि आध्यात्मिक जगाचे मार्गदर्शक असलेले गुरु नानक देव जी यांचे जीवन आणि शिकवणीचे स्मरण करतो. गुरू नानक देवजींचा संदेश धर्म, जात आणि पातीच्या सर्व सीमा दूर करतो आणि जगात समानता आणि करुणेची शिकवण देतो. त्यांच्या शिकवणीत सर्व बाबतीत देवाची एकता, निःस्वार्थ सेवेचे महत्त्व आणि जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये सत्याचे मूल्यांवर जोर देतो.

गुरु नानक देव जी यानी त्यांच्या अनुयायांना नम्रता, ध्यान आणि देवाच्या नावाचे सतत स्मरण करण्यास प्रोत्साहित केले. प्रामाणिक भक्ती, प्रामाणिक जीवन आणि इतरांना मदत केल्यानेच आध्यात्मिक वाढ होऊ शकते असा त्यांचा विश्वास होता.

हा पवित्र दिवस पाळत असताना, गुरू नानक यांच्या बंधुता आणि मानवतेच्या सेवेच्या संदेशाचे चिंतन करूया, जे शाश्वत आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात त्याच्या शिकवणुकीचे आचरण करून  हे जग सर्वांसाठी एक चांगले स्थान बनविण्याचा प्रयत्न करूया. या गुरु नानक जयंतीच्या प्रसंगी आपल्याला नम्रता, करूणा आणि सत्याच्या मार्गाने जगण्याची प्रेरणा मिळो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

Trending

Exit mobile version