गोवा खबर

अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Published

on

Spread the love
गोवा खबर:अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाने गोव्यातील पारंपारिक बेकर्स आणि इतर बेकर्ससाठी ‘अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणन आणि पोषण’ या विषयावर कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने अन्न आणि औषध प्रशासन संचालक श्रीमती श्वेता एस. देसाई यांच्या प्रमुख भाषणाने झाले, त्यानी ब्रेडचे महत्त्व आणि त्याची ओळख कशी कमी होत आहे याविषयी सांगितले. बेकरी क्षेत्रातील सुरक्षितता आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी फूड सेफ्टी ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन प्रशिक्षणाच्या गरजेच्या महत्त्वावर त्यानी भर दिला.
नंतर शेफ रॉडविनने बेकरी उत्पादनांच्या आरोग्यदायी पाककृतींवर प्रकाश टाकणारे रेसिपी पुस्तकाचे प्रकशन केले. शेफ रॉडविन यांनी “हेल्दी ब्राउन: आधुनिक बेकिंगसाठी एक दृष्टीकोन” या विषयावर व्याख्यान दिले आणि ब्रेडसह मैदा आधारित बेकरी उत्पादनांसाठी आरोग्यदायी पर्यायांच्या निर्मितीच्या गरजेवर भर दिला.
पोषण विषयावर श्रीमती रोहिणी दिनीज यांनी निरोगी आणि शाश्वत अन्न खाण्याचे महत्त्व आणि आपल्या आहारात विविध धान्यांचा समावेश कसा करावा यावर प्रकाश टाकला.

Trending

Exit mobile version