गोवा खबर

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे गोव्यात आगमन

Published

on

Spread the love

गोवा खबर:भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे आज गोव्यात आगमन झाले आणि त्यांचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, शिष्टाचार मंत्री श्री माविन गुदिन्हो आणि इतरांनी त्यांचे आयएनएस हंसा नौदल तळावर जोरदार स्वागत केले तसेच नौदलाच्या स्वागर पथकाने राष्ट्रपतींना मानवंदना दिली.

       दक्षिण गोवा लोकसभा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेते श्री युरी आलेमाव, मुख्य सचिव डॉ. व्ही. कादावेलू, आयएएस, नौदल प्रमुख, ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस, आयएएस उपस्थित होत्या.

        तद्नंतर राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, कारवार येथील भारतीय नौदलाच्या  आयएनएस विक्रांत बोटीवर भेट देण्यासाठी निघाल्या. आयएनएस विक्रांत ही भारतीय नौदलाची एक महत्वाची विमानवाहू बोट असून  राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू या बोटीच्या कार्याची माहिती करून घेतील.

Trending

Exit mobile version