गोवा खबर

प्रधानमंत्री राष्टीय अप्रेंटीसशीप मेळाव्याचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाने ११ नोव्हेंबर २०२४  रोजी  उत्तर गोव्यात सरकारी आयटीआय आल्तिन पणजी येथे सकाळी ९ वाजल्यापासून  प्रधानमंत्री अप्रेंटीसशीप मेळाव्याचे आयोजन केले आहे.

अप्रेंटीसशीप मेळाव्यात अनेक सार्वजनिक, खाजगी आस्थापने सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

इच्छुक आयटीआय उमेदवार आणि इतर स्थानिक युवकांनी नावनोंदणी आणि आपले करियर घडविण्यासाठी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी सकाळी ९.०० वाजता मेळाव्याच्या ठिकाणी हजर रहावे.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी सरकारी आयटीआय, पणजी ०८३२ – २२२६३३३ / ९९२३१४४३४१ क्रमांकावर संपर्क साधावा.

Trending

Exit mobile version