गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकार आपल्या नागरिकांसाठी उत्तम आरोग्य सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि या दिशेने त्यांनी पंतप्रधान-सुरक्षा विमा योजना आणि पंतप्रधान-जीवन ज्योती विमा योजना यांसारख्या आरोग्य विमा योजना लोकांच्या हितासाठी लागू केल्या आहेत असे सांगितले. श्री सावंत मंत्रालय, सचिवालय येथे उपरोक्त विमा योजनाधारकांच्या जाहिरातीद्वारे संदेश वाहून नेणाऱ्या दोन वाहनांना हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ते बोलत होते.
गोवा सरकारने गोवा सीएसआर प्राधिकरण आणि भारत सीएसआर नेटवर्क यांच्या सहकार्याने आज मंत्रालय सचिवालयात पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना या दोन महत्त्वाकांक्षी आरोग्य योजनांबद्दल जनजागृती मोहीम सुरू केली.
योजनांच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना डॉ. सावंत यांनी या विमा योजना एक वर्षाच्या मुदतीच्या विमा योजना आहेत आणि पंतप्रधान-सुरक्षा विमा योजनेसाठी प्रति वर्ष २० रुपये किमान हप्ता भरावा लागेल आणि मृत्यू आल्यास २ लाख रुपये आणि अंशिक दिव्यांगत्वासाठी १ लाख रुपये दिले जातील. तर पंतप्रधान-जीवन ज्योती विमा योजना या दुसऱ्या योजनेत ग्राहकांना प्रति वर्ष रुपये ४३६/- भरावे लागतात आणि कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास २ लाख रूपये दिले जातील असे सांगितले. या योजना तळागाळातील गरजू लोकांपर्यंत पोहोचाव्यात अशी सरकारची इच्छा आहे आणि म्हणूनच ही दोन्ही वाहने सुरू करण्यात आली आहेत असे ते म्हणाले. त्यांनी या योजनांबद्दल ही वाहने जनजागृती करतील जेणेकरून प्रत्येक पात्र नागरिक या योजनांचा लाभ घेतील आणि त्याचे आरोग्य सुरक्षित ठेवेल असे त्यांनी सांगितले. आपले जीवन सुरक्षित करण्यासाठी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
डीपीएसईचे संचालक श्री विजय व्ही. सक्सेना यांनी या योजनांबद्दल बोलताना या योजना सर्वसामान्यांच्या हिताच्या आहेत आणि परवडणाऱ्या आहेत. विमा योजनांमध्ये कमीत कमी हप्ता असतो जो परवडणारा असतो म्हणून त्यांनी लोकांना सुरक्षित जीवन जगण्यासाठी त्यांच्या विमा उतरविण्याचे सुचविले आहे.
गोवा सीएसआरचे ओएसडी श्री गणराज मोरजकर, भारत सीएसआर नेटवर्कचे संस्थापक अध्यक्ष श्री साजिद सय्यद, आरआयओ फाउंडेशनचे संस्थापक श्री शहाबुद्दीन काणीकर, उपसंचालक कैलास गोखले व इतर यावेळी उपस्थित होते.