गोवा खबर

कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई न केल्यास कॅनडा सरकारला जागे करण्यासाठी त्यांच्या दूतावासासमोर निदर्शने करू:हिंदु जनजागृती समिती

Published

on

Spread the love

गोवा खबर:कालच कॅनडाच्या ब्रेम्प्टन भागातील हिंदू मंदिरावर ‘सीख फॉर जस्टीस’ या संघटनेने आणि खलिस्तानवादी कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक हल्ला केलामात्र या हिंसक हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच पाठिशी घालण्याचा प्रकार कॅनडा सरकारने केला आहेयाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोयापूर्वीही कॅनेडामध्ये मंदिरांवर हल्ले झाले आहेतकॅनडा सरकारने हे सर्व हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करून सर्व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावीअशी आमची मागणी आहेअन्यथा कॅनड सरकारला जागे करण्यासाठी भारतातील त्यांच्या दूतावासासमोर हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येईलअशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीने दिली आहे.

      भारतीय उच्चायुक्त हे कॅनडातील मंदिराच्या भेटीसाठी जाणार हे माहिती असतांनाही त्यांच्या आणि मंदिर यांच्या सुरक्षेसाठी वा सदर हल्ला होऊच नये म्हणून कॅनडा सरकार काहीही ठोस कृती केलेली नाहीत्यामुळे या हल्ल्याला कॅनडा सरकारची मुकसंमती होती का असा प्रश्न निर्माण होत आहेखलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर कॅनडामध्ये हिंदूंवरीलतसेच मंदिरांवरील हल्ले रोखण्यात कॅनडा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहेत्यामुळे भारत सरकारने हे सूत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडून कॅनडा सरकारवर कारवाई करण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजेअशी आमची भारत सरकारकडे मागणी आहेहल्लेखोर संघटनेचे भारतात जे कोणी पाठिराखे असतीलत्यांच्यावर भारत सरकारने कठोर कारवाई करावीअशी आमची मागणी आहे

Trending

Exit mobile version