गोवा खबर:उत्तर गोवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या समन्वयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय त्सुनामी मॉक कवायतीला आज मोरजी समुद्रकिनाऱ्यावर चांगला प्रतिसाद मिळाला. त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तीच्यावेळी हाती घेण्यात येणाऱ्या उपायासंबंधी तसेच यंत्रणेचा वापर आणि इतर संबंधित प्रात्यक्षिक सरावाच्या कवायती घेण्यात आल्या.
विविध सरकारी खात्याचे अधिकाऱ्यांनी मॉक ड्रिल कवायतीमध्ये भाग घेतला. उत्तर गोवा जिल्हा नियंत्रण कक्षाकडूनही संबंधित खात्यांना चेतावणी संदेश देण्याचा सराव झाला.
तद्नंतर ग्रामपंचायत मोरजी येथे आयोजित राष्ट्रीय त्सुनामी मॉक कवायतीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी श्री ईश्वर परब होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी – २, श्री. प्रविण हिरे परब, उपजिल्हाधिकारी श्री शिवप्रसाद नाईक, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती. वर्षा परब, मोरजीचे सरपंच श्री, पवन मोरजे व इतर अधिकारी उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी हाती घेण्यात येणारे उपाय आणि इतर तयारीचा उपाय माकड्रिल कवायतीव्दारे करण्यात येतो. त्याचप्रमाणे विविध संबंधित यंत्रणाना येऊन आपल्या कामाचा आणि कर्तव्याचा सराव करण्याची संधी अशा कवायतीतून मिळते.