गोवा खबर

जॅकीस यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती

Published

on

Spread the love

गोवा खबर:नवी दिल्लीतील भारतीय निवडणूक आयोगाने महसूल सचिव श्री. संदिप जॅकीस यांची गोवा राज्यासाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. १ जानेवारी २०२५ ही पात्रता तारीख म्हणून सध्याच्या मतदार यादीची विशेष उजळणी चालू आहे.

मतदार यादी निरीक्षक सर्वसामान्य लोकांचे कोणतेही दावे/प्रस्न असल्यास ते स्वीकारण्यासाठी १४ नोव्हेंबर  २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता पणजीतील उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषदगृहात आणि संध्याकाळी ३.३० वाजता खोली क्र. ४०७, सेमिनार सभागृह, चौथा मजला, माथानी साल्ढाणा प्रशासकीय प्रकल्प, मडगांव येथे उपलब्ध असतील. तसेच सर्वसामान्य लोक चेंबर क्रमांक १०२, दुसरा मजला, सचिवालय, पर्वरी, बार्देश-गोवा, ४०३५२१  येथे त्यांच्या कार्यालयांत संपर्क साधू शकतात किंवा त्यांच्याशी फोन क्रं. ०८३२-२४१९४११, २४१९६२० वर संपर्क करू शकतात.

Trending

Exit mobile version