गोवा खबर

‘जुने गोवे येथील ‘हातकातरो खांबा’चे ऐतिहासिक वारसा म्हणून जतन आणि संरक्षण करावे !’

Published

on

Spread the love
हिंदू राष्ट्र समन्वय समितीची पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याकडे आवाहन

गोवा खबर:जुने गोवे येथील ‘हातकातरो खांबा’चे एक ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करावे. ‘हात कातरो’ खांबाच्या संरक्षणासाठी त्याला संरक्षक कुंपण करावे. खांबाची निगा राखणे आणि संरक्षण करणे यांसाठी व्यवस्था करावी. खांबाच्या शेजारी खांबाचे ऐतिहासिक महत्त्व दर्शवणारा ठसठशीतपणे दिसेल, असा पितळी अथवा दगडी फलक लावावा, अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीने पुरातत्त्व खात्याचे मंत्री श्री. सुभाष फळदेसाई यांच्याकडे ३ नोव्हेंबर या दिवशी एका निवेदनाद्वारे केली आले.

या वेळी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या शिष्टमंडळामध्ये ‘आंतरराष्ट्रीय बजरंग दला’चे राष्ट्रीय प्रमुख सर्वश्री नितीन फळदेसाई, ‘भारत माता की जय संघटने’चे शिवानंद देसाई, आनंद गुरव, परेश पणशीकर, सज्जन जुवेकर, गजानन हरमलकर आणि रोहन देसाई, विश्व हिंदू परिषदेचे संजू कोरगावकर, हिंदु जनजागृती समितीचे विशाल देसाई, सनातन संस्थेचे गोविंद लोलयेकर आदी मान्यवरांचा सहभाग होता.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, शौय आणि धैर्य यांच्या इतिहासाची स्मृती जागृत ठेवणार्‍या वस्तू आणि वास्तू इतिहासाच्या साक्षीदार असतात. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राष्ट्रप्रेम जागृत ठेवण्याचा संदेश या वस्तू आणि वास्तू देत असतात. जुने गोवे येथील हा खांब आता मजूर लोकांचे आश्रयस्थान झालेले आहे. तसेच हल्लीच या खांबाला पिवळा रंग मारून या ऐतिहासिक खांबाची विटंबना करण्यात आली होती. ही विटंबना करणार्‍यांवर कारवाई करावी.

Trending

Exit mobile version