गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना दीपावलीच्या शुभमुहूर्तावर शुभेच्छा देत सर्वांना सुख, समृद्धी आणि सौभाग्य लाभो अशी प्रार्थना केली आहे.
आपल्या संदेशात मुख्यमंत्री सावंत म्हणतात, दिव्यांचा सण, या दीपावलीच्या आनंददायी प्रसंगी, मी गोव्यातील जनतेला माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. दिवाळी हा एक उत्साहवर्दक उत्सव असून अंधारावर प्रकाशाचा आणि वाईट प्रवृत्तीवर चांगल्याचा विजयाचे प्रतिक आहे. रावणाचा वध करून अयोध्येत परतलेल्या भगवान रामाचे स्वागत करण्यासाठी लोकांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली होती.
सावंत म्हणतात, दिवाळी सण लोकांना प्रेरणा देतो आणि समाजात शांतता, बंधुत्व आणि सामाजिक सलोखा वाढिस लागतो. संस्कृती आणि परंपरेने लोक या प्रसंगी एकत्र येतात. दिवाळी सण कुटुंबांना आणि समुदायांला एकत्र आणते आणि एकतेचे क्षण जपते.
राज्याचा झपाट्याने विकास होत असून राज्य स्वयंपूर्णतेच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. दिवाळी साजरी करीत असताना अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करूया. मी लोकांना आवाहन करतो की स्थानिक उत्पादने विकत घ्या आणि उत्सव साजरा करा जेणेकरून स्थानिक उत्पादकांच्या जीवनात नवा प्रकाश येईल आत्मानिर्भर भारत ‘वोकल फॉर लोकल’ वर अधिक भर देत आहे. हिरवे फटाके पेटवून सण साजरे करूया आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करूया, असे मुख्यमंत्री म्हणतात.