गोवा खबर

९ वा आयुर्वेद दिन साजरा

Published

on

Spread the love

गोवा खबर : सरकारने ९ वा आयुर्वेद दिवस साजरा केला. या उत्सवाच्या निमित्ताने राज्य आयुष संस्था, राष्ट्रीय आयुष मिशन, आरोग्य सेवा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सचिवालयातील परिषद गृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना सार्वजनिक आरोग्य उपसंचालक डॉ. रुपा नाईक यांनी आयुर्वेदामध्ये नवीन संशोधनाची गरज असल्याचे सांगितले कारण ते तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्तम रुग्ण निदान आणि उपचार वैयक्तिकरणासाठी प्रगती करीत आहे.

डॉ. नाईक पुढे म्हणाल्या, आयुर्वेद ही एक प्राचीन प्रणाली असल्याने तणाव, जीवनशैलीचे आजार आणि एकूणच निरोगीपणा यासह आधुनिक आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून जगभरात प्रसिध्द आहे. लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे ज्यासाठी सरकारने आयुर्वेदिक वैद्यकीय प्रणालीला प्रोत्साहन दिले आहे.

आयुर्वेद इनोव्हेशन फॉर ग्लोबल हेल्थ या संकल्पनेबाबत  डॉ. नाईक यांनी पारंपारिक पद्धतींमधील प्रगती जागतिक आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी कशी योगदान देऊ शकते हे दाखवून देणारे आयुर्वेदातील नवकल्पना, आयुर्वेदाची अनुकूलता, आधुनिक विज्ञानासह, लोकांना भेडसावणाऱ्या आरोग्य समस्यांवर शाश्वत उपाय कसे देऊ शकतात याकडे या वर्षीचा कार्यक्रम लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो असे सांगितले.

आपल्या स्वागतपर भाषणात आयुष सोसायटीचे उपसंचालक डॉ. मीनल जोशी यांनी आयुर्वेद दिन साजरा करण्यामागचा उद्देश लोकांमध्ये आयुर्वेदाबद्दल जागरुकता आणणे आणि आयुर्वेदिक वैद्यकीय पद्धतींचा प्रचार करणे हा आहे असे सांगितले.

जीएडीचे अवर सचिव शैलेश डी सिल्वा यांनी यावेळी बोलतांना आयुर्वेदिक वैद्यकीय पध्दतीच्या महत्त्वावर भर दिला. उत्तम आरोग्यासाठी योगसाधना, ध्यानधारणा अंगिकारण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी या क्षेत्रातील प्रशंसनीय कार्याबद्दल आयुर्वेदाच्या संबंधितांचे अभिनंदन केले.

खोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ., अनुपा नाईक, शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. गौरी प्रभू, शिवोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पुष्पराज आमोणकर,  मडगाव पीएचसी डॉ. सुप्रिया प्रभू, हळदोणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. आदित्य बर्वे, डॉ. स्वाती अन्वे यांचा आयुर्वेदिक वैद्यकीय उपचारांना प्रोत्साहन दिल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

वरिष्ठ होमिओपॅथिक सल्लागार डॉ. रुपाली वेर्णेकर, हळदोणा पीएचसी, सामुदायिक आरोग्य अधिकारी, पीएचसी सीएचसी जिल्हा रुग्णालयांचे डॉक्टर यावेळी उपस्थित होते.

Trending

Exit mobile version