गोवा खबर

मतदार यादी विशेष उजळणी कार्यक्रम

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार १ जानेवारी २०२५ ही पात्र तारीख ठरवून राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या संदर्भात मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल, असे राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने कळविले आहे. त्यामुळे मतदार यादी विशेष उजळणी मोहिम निश्चित केली आहे.

विशेष मतदार यादी उजळणी कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन २९ ऑक्टोबर २०२४  रोजी होईल. मतदार यादीसंबंधी कोणतेही दावे आणि हरकती दाखल करण्याचा कालावधी २९ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत स्वीकारतील.  राज्यांत ९, १०, २३ आणि २४ नोव्हेंबर २०२४ रोजी विशेष मोहीम होईल. दावे किंवा आक्षेप असल्यास ते २४ डिसेंबर २०२४ पर्यंत  निकालात काडण्यात येईल आणि ६ जानेवारी २०२५ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होईल.

मतदारयादी आणि राजकीय पक्षाना मतदार यादी तपासण्यासाठी  २९ ऑक्टोबर २०२४ ते २८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत संबंधित मतदान केंद्र, संबंधित निर्वाचन अधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या  कार्यालयात उपलब्ध असेल.  मतदारांनी यादीतील आपल्या नावाची तपासणी करावी आणि दुरूस्ती करावयाची असल्यास तसा अर्ज भरून  दुरूस्ती करून घ्यावी.

निवडणूक आयोगाच्या मतदार हेल्पलाइन मोबाईल ॲप आणि https://voters.eci.gov.in/ वर ऑनलाइन ईसेवा उपलब्ध आहे. तसेच मुख्य निर्वाचन अधिकारी, गोवा  यांच्याकडे www.ceogoa.nic.in  या व्हेबसाइटवरून अर्ज करू शकतात.

Trending

Exit mobile version