गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून आदिवासी कल्याण संचालनालयाच्या कामगिरीचा आढावा

Published

on

Spread the love

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आल्तिन, पणजी येथे वित्त खात्याचे अतिरिक्त सचिव श्री विकास गावणेकर, आदिवासी कल्याण संचालक श्री दशरथ रेडकर आणि मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी डॉ. प्रतिभा एलएस, खात्याच्या अधिकाऱ्यांसह आदिवासी कल्याण संचालनालयाच्या कामगिरीचा आढावा घेतला.

बैठकीत आदिवासी व्यवहार मंत्रालयांच्या केंद्र पुरस्कृत योजनेशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच मुख्यमंत्र्यांनी आदिवासी उपयोजनेची अंमलबजावणीचा आणि आदिवासी उपयोजनेची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व खात्यांच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला.

मुख्यमंत्री शिष्यवृत्ती पोर्टलवर राबविण्यात येणाऱ्या योजनांचा समावेश असलेल्या राज्य पुरस्कृत योजनांच्या कामगिरीचाही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. नोव्हेंबर महिन्यापासून आदिवासी कल्याण संचालनालयामार्फत आधार ब्रिज पेमेंट प्रणालीद्वारे विविध ६ योजनांचे पेमंट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अंत्य संस्कार सहाय्य योजना आणि विधवांच्या मुलांना व अनाथ मुलांना आधार देणारी योजना यासारख्या योजनांचे अर्ज ऑनलाइन स्वीकारले जातील जेणेकरून अर्जदाराला अर्ज सादर करण्यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या प्रमुखांकडे जावे लागणार नाही.

या पोर्टलच्या विकासाच्या स्थितीसह विद्या लक्ष्मी योजनांच्या अंमलबजावणीशी संबंधित समस्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांना फिक्स डिपॉझिटवर दावा करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे विविध प्रयत्न मुख्यमंत्र्यांना समजावून सांगण्यात आले.

खात्यासमोरील अडचणी कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विविध उपाय सुचविले.

Trending

Exit mobile version