गोवा खबर

पोलिसांची बदनामी केल्याबद्दल अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकीवर गुन्हा दाखल करा !: सुराज्य अभियानाची मागणी

Published

on

Spread the love
पोलिसांचा वेश परिधान करून ‘बिग कॅश पोकर’द्वारे जुगार खेळण्याचे आवाहन !
गोवा खबर:पोलिसांचा गणवेश परिधान केलेला सिनेअभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी लोकांना जुगार खेळण्याचे आवाहन करत असल्याची धक्कादायक जाहिरात ‘बिग कॅश पोकर’ (Big Cash Poker) या ऑनलाईन ॲपने केली आहे. जे पोलीस खाते जुगार खेळणार्‍यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करते, त्याच पोलिसांच्या वेशात अशी जाहिरात केली जाते, हे  पोलिसांची प्रतिमा मलीन करणारे आणि धक्कादायक आहे. हिंदु जनजागृती समितीचे ‘सुराज्य अभियान’ याचा तीव्र शब्दांत निषेध करते. या जाहिरातीकडे दुर्लक्ष केले, तर अनेक अवैध, अनैतिक गाष्टींच्या जाहिरातींसाठी पोलिसांच्या गणवेशाचा वापर केला जाऊ शकतो. ‘ऑन ड्युटी’ आणि गणवेशात असतांना पोलीस जुगार खेळण्याचे आवाहन करतांना दाखवणे, हे लज्जास्पद असून ‘बिग कॅश पोकर’ ऑनलाइन ॲपवर गोवा पोलिसांनी तत्परतेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘सुराज्य अभिमाना’ने केली आहे.
या प्रकरणी *हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने श्री. सत्यविजय नाईक यांनी* २३ ऑक्टोबर २०२४ या दिवशी सायबर गुन्हे विभागाचे पोलीस अधीक्षक श्री. राहुल गुप्ता यांच्याकडे  तक्रार नोंदवली आहे.
यावेळी ‘सुराज्य अभिमाना’च्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री राज बोरकर, मिलिंद कारखानीस, सुशांत दळवी आणि रामदास सावईवेरेकर यांचा समावेश होता. यामध्ये ‘बिग कॅश पोकर’चे मालक अंकुर सिंघ, व्यवस्थापक आणि विज्ञापनात काम करणारे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यावर गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्री. सत्यविजय नाईक यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत पोलीस महासंचालकांनाही देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस खात्याचे प्रमुख म्हणून गृहमंत्र्यांनीही लक्ष घालावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Trending

Exit mobile version