गोवा खबर

राष्ट्रीय पॅरा स्विमिंग स्पर्धेचा दुसरा दिवस गाजला खेळाडूंच्या विक्रमी सहभागाने आणि असाधारण कामगिरीने

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारतीय पॅरालिम्पिक समिती आणि गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य अपंग आयुक्त कार्यालय आणि अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागातर्फे आयोजित २४व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेचा दुसरा दिवसही रोमांचकारी ठरला.

काम्पाल-पणजी येथील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या जलतरण तलाव संकुलामध्ये आयोजित या स्पर्धेत भारताभरातून सहभागी पॅरा-ॲथलीट्सनी दृढ निश्चय, जिद्द, मेहनत आणि प्रतिभा या गुणांचे दर्शन घडविले.

२८ राज्यांतील ५००हून अधिक खेळाडूंनी विविश्र श्रेणींमधून अतिशय चुरशीने ही स्पर्धा गाजवली असून एकूणच हा उपक्रम स्पर्धाभावनेचा सोहळा तर ठरलाच आहे त्याचबरोबर खेळामध्येही सर्वसमावेशकता वाढवण्यासाठी देशाच्या वचनबद्धतेचाही एकप्रकारे सन्मान ठरला आहे. एकूणच दुसरा दिवस स्पर्धास्थळाचे वातावरण रोमांचक असे होते. अनेक स्पर्धकांनी आपल्या कामगिरीचा कळस गाठल्याचे पाहावयास मिळाले तर प्रेक्षकांनीही या खेळाडूंना जल्लोषात प्रोस्ताहन दिले.

दिवस-२ची प्रमुख क्षणचित्रे:

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी फ्रीस्टाइल, ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोक आणि बटरफ्लाय स्ट्रोकचा अशा विविध प्रकारांमध्ये विविध श्रेणींमधील सामने खेळवले गेले.

यातील काही उत्सुकता वाढवलेल्या श्रेणी अशा आहेत:

• ५० मीटर फ्रीस्टाइल (पुरुष आणि महिला): श्रेणी S-1 ते S-13

• २०० मीटर फ्रीस्टाइल (मिश्र): श्रेणी S-14

• ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक (पुरुष आणि महिला): श्रेणी SB-1 ते SB-13

• १०० मीटर बॅकस्ट्रोक (पुरुष आणि महिला): श्रेणी S-1 ते S-14

• ५० मीटर आणि ५० मीटर बटरफ्लाय स्ट्रोक (पुरुष आणि महिला): श्रेणी S-1 ते S-14

दिव्यगत्वाच्या स्तरावर आधारित विविध श्रेणींचा समावेश केल्याने ही स्पर्धा अधिक निष्पक्ष आणि सर्वसमावेशक ठरली असून, विविध शारीरिक क्षमता असलेल्या खेळाडूंना त्यांच्या समतुल्य स्पर्धकांशी स्पर्धा करणे शक्य होत आहे.

एस (S) या श्रेणीप्रकारांमध्ये शारीरिक दिव्यंगत्व असलेल्या (S-1 सर्वात गंभीर) पासून दृष्टिदोष किंवा बौद्धिक दिव्यंगत्व (S-14) पर्यंत दिव्यंगत्वांची विस्तृत श्रेणी समाविष्ट आहे.

दुसऱ्या दिवशीही अनेक चमकदार कामगिरी सादर झाल्या. ५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारामध्ये एस-९ आणि एस-१० श्रेणींमधील स्पर्धकांनी उच्च कौशल्य आणि वेगाचा थरार सादर केला. हे सामने खूपच चुरशीने खेळले गेले व शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ठरले. १०० मीटर बटरफ्लाय स्ट्रोक प्रकारामध्ये एस—६ श्रेणीतील स्पर्धकांनीही चुरशीने सामना केल्याचे पाहायला मिळाले.

देशभरातून आलेल्या अनेक उदयोन्मुख खेळाडूंनीही या स्पर्धेत आपली चांगलीच छाप पाडल्याचे दुसऱ्या दिवशी अनुभवयाला मिळाले. कर्नाटक, महाराष्ट्र आणि पंजाबमधील युवा पॅरा-जलतरणपटूंनी अविश्वसनीय कामगिरी सादर केली.

अशियाई पॅरा गेम्स, पॅरालिम्पिक स्पर्धा अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवण्याची आकांक्षा बाळगून प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंसाठी ही २४वी राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धा एक महत्वाचा टप्पा ठरत आहे. स्पर्धेची चुरस, या स्पर्धेत मिळत असलेला अनुभव यामुळे भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हानाला सज्ज करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.

२२ ऑक्टोबर रोजी स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी अनेक स्पर्धक विविध पदकांची लयलूट करताना तसेच बहुप्रतिक्षित नेत्रदीपक समारोप समारंभाचा अनुभव प्रेक्षकांना घ्यायला मिळणार आहे. गेल्या दोन दिवसांत उत्कटतेने आणि दृढनिश्चयाने कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंच्या कर्तृत्वाची नोंद शेवटचा दिवस हा विविध श्रेणींमधून अभिमानाने झळकणाऱ्या पदकांच्या माध्यमातून घेणार आहे.

Trending

Exit mobile version