गोवा खबर : कामगार आणि रोजगार मंत्री अतानासियो मोन्सेरात यांच्या अध्यक्षतेखाली पर्वरीतील मिनिस्ट्रियल ब्लॉक येथे आयोजित केलेली गोवा कामगार कल्याण मंडळाची ४७ वी बैठक संपन्न झाली.
यावेळी कामगार आणि रोजगार आयुक्त आणि गोवा कामगार कल्याण मंडळाचे सचिव डॉ. लेव्हिन्सन मार्टिन उपस्थित होते.
या बैठकीत प्रथमोपचार प्रशिक्षण, कौशल्य विकास इत्यादी अनेक कल्याणकारी योजनांच्या निर्मितीसंबंधी चर्चा करण्यात आली. चर्चा करण्यासाठी त्या कल्याणकारी योजना मंडळाच्या उपसमितीकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. सदस्यांनी कामावरून काडलेल्यांच्या कामगार सहाय्य योजनेवर चर्चा केली आणि कामगारांच्या हितासाठी त्यात अतिरिक्त बदल करण्याचा प्रयत्न केला.
इतर गोष्टींबरोबरच, कामगार कल्याण निधी अधिनियम, १९८६ चे काटेकोरपणे पालन केले जाईल याची खात्री करण्याचा निर्णय घेण्यात आला.