गोवा खबर : उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यातील हरवळे ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वित्त खात्याने (महसूल आणि नियंत्रण) हरवळे ग्रामपंचायत क्षेत्रात मतदान आणि मतमोजणीच्याकालावधीपर्यंत म्हणजे १९,२० आणि २१ ऑक्योबर २०२४ रोजी दारूची विक्री, वाहतूक आणि जवळ बाळगम्यास निर्बंध लागू केले आहेत.
वरील दिवसात हरवळे ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व दारूची दुकाने आणि अस्थापने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. तसेच कोणतीही व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्यासह बियर सोडून भारतीय बनावटीच्या विदेशी दारूची किंवा विदेशी दारूची पाऊण बाटली आणि ६५० एमएलच्या सहा बियरच्या बाटल्या आणि देशी दारूची पाऊण बाटली एका जागेवरून दुसऱ्या जागी नेऊ शकतील किंवा जवळ बाळगू शकतात.