गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना दसऱ्याच्या शुभप्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, दसरा हा सण विजयादशमी म्हणूनही ओळखला जोतो. दसरा हा सण महत्वपूर्ण सण असून दसऱ्याच्या उत्सवाने नवरात्रीच्या उत्सवाची सांगता होते. दसरा हा सण वाईट प्रवृत्तीवर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. प्रभू रामाने रावणावर मिळविलेल्या विजयाचा दिवस साजरा करण्यासाठी व माता दुर्गादेवीने महिषासुराला मारून वाईट शक्तींशी लढा देऊन मिळविलेला विजय म्हणून दिवस साजरा केला जातो.
आपल्या संदेशात मुख्यमंत्री पुढे म्हणतात, दसरा हा सण मोठ्या उत्साहाने आणि आध्यात्मिक भावनेने साजरा केला जातो. दसरा हा सण आनंदाचा उत्सव असून विविधतेत एकता या संकल्पनेवर आपला विश्वास ढृढ करतो. “गोवा राज्य समृद्ध आणि विकसित होण्याच्या मार्गावर आहे. या सणासुदीच्या निमित्ताने, आपण सतत या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत पुढे जाऊया. मी जनतेला आवाहन करतो की त्यांनी विकासात हातभार लावावा आणि राज्याला वैभवाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो.
गोवा राज्य विकास आणि भरभराटीकडे वाटचाल करते. या उत्सवाच्या प्रसंगी आम्ही गोव्याला प्रगतीशील राज्य करण्यास कटीबद्द होऊया. दसऱ्याचा उत्सव प्रत्येकाच्या जीवनात अधिक शांतता आनंद आणि भरभराट घेऊन येवो असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.