गोवा खबर

स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलने गोव्याच्या सर्जनशील इकोसिस्टमसाठी तयार केले धोरण

Published

on

Spread the love
गोवा खबर : गोव्याला भारताची डिझाईन कॅपिटल म्हणून स्थान देण्याच्या दिशेने काम करणाऱ्या सर्जनशील व्यावसायिकांचा एक गट, द क्रिएटिव्ह कम्युनिटी ऑफ गोवाने (सीसीजी) विल्ट्रान्स प्राय. लि. फातोर्डा येथे फर्स्ट फ्रायडेजच्या ८व्या आवृत्तीचे आयोजन केले होते. स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेल (एसआयटीपीसी), माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स (डीआयटीईअँडसी) विभाग, गोवा सरकार आणि एडीआय गोवा यांनी ही बैठक आयोजित केली होती.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे गोव्यासाठी प्रस्तावित डिझाइन धोरणावर चर्चा, एसआयटीपीसीचे नेतृत्व आणि सीसीजीच्या वेबसाइटचे प्री-लाँच, हे राज्यभरातील सर्जनशील समुदायांना जोडण्याचे एक व्यासपीठ आहे.
चर्चेची सुरुवात करताना, स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलचे सीईओ, श्री. डी. एस प्रशांत म्हणाले, कि “नऊ महिन्यांपूर्वी, आम्ही डिझाइनिंग समुदाय मजबूत करण्यासाठी आणि सर्वसमावेशक डिझाइन धोरण विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. संघ म्हणून एकत्र येणे आणि समविचारी कंपन्यांना गोव्यात उपस्थिती प्रस्थापित करण्यासाठी आकर्षित करणे, हे आमचे ध्येय आहे. सरकारचा एक भाग म्हणून आम्ही, गोव्याचे सर्जनशील केंद्र म्हणून ब्रँडिंग करण्यावर आणि इकोसिस्टमच्या गरजा पूर्ण केल्या जातील याची खात्री करून, येथे उपलब्ध संधी ओळखण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.”
सीहॉर्स एअर लिमिटेड (यूके) चे मुख्य डिझाईन अधिकारी आणि डिझाईन इंटरव्हेंशन (इंडिया) चे संचालक तसेच सीसीजीचे संस्थापक सदस्य, श्री. दीपक पठानिया यांनी गोव्याच्या क्रिएटिव्ह समुदायाचा प्रवास कथन केला. त्यांनी व्यक्त होताना संगितले, कि “नोव्हेंबर २०२३ मध्ये, आम्ही गोवा सरकारच्या स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलद्वारे समर्थित डिझाइन धोरणावर चर्चा सुरू केली. आर्थिक आणि सांस्कृतिक संसाधन म्हणून गोव्याच्या सर्जनशील क्षमतेचा उपयोग करून, राज्याला भारताची सर्जनशीलतेची राजधानी म्हणून स्थान देणे, हे सरकारचे यामागील उद्दिष्ट आहे. सीसीजीने वाढत्या सदस्यसंख्येसह, एक एकीकृत डेटाबेस असलेली वेबसाइट लॉन्च करून तसेच समुदायाची आव्हाने ओळखण्यासाठी डब्ल्यूआयपी दस्तऐवजाच्या विकासासह, एक आशादायक पाया घातला आहे.”
कार्यक्रमाचे ठिकाण विल्ट्रान्स प्राय. लि. ने श्री. दीपक यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी डब्ल्यूआयपी (वर्क इन प्रोग्रेस) म्हणून प्रदर्शित केलेल्या विविध ड्रोन मॉडेल्सची वैशिष्ट्यपूर्ण पार्श्वभूमी दर्शविण्यास महत्वाचे काम केले. सीहॉर्स एच ५ – हे सीहॉर्स एअर लिमिटेडने डिझाइन केलेले आणि विल्ट्रान्स प्राय. लि. द्वारे उत्पादित केलेले कमी-उड्डाण करणारे व्हीटीओपी रोटरक्राफ्ट. लि. आहे.
त्यांनी पुढे केवळ विकासाच्या टप्प्यात असताना, विशेषत: समुदाय सदस्यांना वैशिष्ट्ये अनुभवता यावी, म्हणून या संकेतस्थळाच्या प्री-लाँचची घोषणा केली. ही वेबसाइट ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या संकेतस्थळाचे प्रोग्रामिंग श्री. वेंडहॅम ग्रे यांनी तर डिझाइन श्री. सौरव रॉय यांनी केले आहे. तर याची संकल्पना श्री. दिपक पठानिया यांची आहे. त्यांनी स्पष्ट केले, की हे संकेतस्थळ वापरकर्त्यांना श्रेणीनुसार पाहण्याची किंवा प्रदेशानुसार शोधण्याची परवानगी देईल व याद्वारे व्यक्तींना समविचारी व्यावसायिकांशी कनेक्ट होण्यास मदत होईल. या प्लॅटफॉर्ममध्ये आधीच्या फस्ट फ्रायडेच्या बैठकांच्या रीकॅप्स, राज्य आणि राष्ट्रीय सरकारी अनुदान व योजनांचा तपशील देणारा ‘गेट सपोर्ट’ विभाग तसेच सर्जनशील खाजगी क्षेत्रातील उपक्रमांचा समावेश असेल. याव्यतिरिक्त, सहयोगासाठी खुले व्यासपीठ, “व्हॉट्स हॅपनिंग एन गोवा” विभाग, डिझाईन-संबंधित इव्हेंट्स हायलाइट करेल आणि नोकरी संबंधित पोस्टिंगसाठी कम्युनिटी बोर्ड असेल. सीसीजी सदस्यांची निर्देशिका, गोव्याच्या क्रिएटिव्ह इकोसिस्टममध्ये सहयोग आणि वाढ मजबूत करण्यास मदत करेल.
सीसीजी वेबसाइट, जीएसआयए डेटाबेस एकत्रित करण्यासाठी देखील कार्य करेल आणि नोंदणी नसलेल्या विक्रेत्यांचे नेटवर्क समाविष्ट करेल. यात त्यांचा समावेश असेल, जे त्यांच्या कलेमध्ये उत्कृष्ट आहेत, परंतु त्यांच्याकडे मजबूत डिजिटल माध्यम उपलब्ध नाही. हा प्रयत्न सर्जनशील/डिझाइन व्यावसायिक आणि गोव्यातील औद्योगिक युनिट्स आणि विक्रेता आधार यांच्यातील परस्पर संबंधांना प्रोत्साहन देईल, सहकार्य वाढवेल आणि दोन्ही क्षेत्रांसाठी संधी वाढवेल.
गोवा डिझाईन धोरणाची सरकारची रूपरेषा सामायिक करताना, सर्व क्षेत्रांमध्ये डिझाइन क्षमता मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्जनशील प्रतिभेला आकर्षित करण्यासाठी त्यांचे पोषण करणाऱ्या संस्थेला चालना देऊन, डिझाइन व नावीन्यपूर्णतेसाठी गोवा हे जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याचा दृष्टीकोन आहे. डिझाईन-चालित उद्योगांसाठी एक सहाय्यक वातावरण निर्माण करणे, शाश्वत विकासावर भर देणे आणि आर्थिक विकासाला चालना देताना, गोव्याचा वारसा जतन करणे, हे ध्येय आहे.
या धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये सहयोगात्मक विकासाला चालना देणे, गोव्याला भारताची सर्जनशीलतेची राजधानी म्हणून स्थान देणे आणि एक इकोसिस्टम तयार करणे समाविष्ट आहे, जी डिझाइनच्या कल्पना आणि प्रोटोटाइपिंगपासून ते उत्पादन आणि विपणनापर्यंत या संपूर्ण जीवनचक्राला समर्थन देते. सर्वसमावेशक आराखड्याद्वारे गोव्याच्या डिझाइन समुदायाला बळकटी देणे, जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करणे आणि डिझाइन सेवा व डिझाइन-संबंधित आर अँड डी मध्ये थेट विदेशी गुंतवणुकीसह गुंतवणूक आकर्षित करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. शिवाय, हे धोरण विविध क्षेत्रे, राज्ये आणि प्रदेशांमध्ये क्रिएटिव्ह डिझाइनच्या विकास, प्रोत्साहन आणि भागीदारीसाठी एक व्यासपीठ तयार करण्याचा प्रयत्न करते.
समुदायाद्वारे आजपर्यंत चर्चा केलेल्या प्रमुख घटकांमध्ये पायाभूत सुविधा वाढवणे, कौशल्य विकास, सर्जनशील व्यवसायांसाठी समर्थन, एक मजबूत नियामक आणि धोरण रचना, क्रिएटिव्ह पार्क्स आणि डिझाईन डिस्ट्रिक्टची स्थापना तसेच तंत्रज्ञान एकत्रीकरण यांचा समावेश आहे. डिजिटल नोमॅड धोरण आणि डिजिटल नोमॅड व्हिसा लागू करून, गोव्यातील डिजिटल नोमॅड समुदायाचा विस्तार करण्यावरही सरकार भर देत आहे.
सहभागींनी जागेच्या गरजेवर भर दिला, जेथे व्यक्ती त्यांचे स्टुडिओ किंवा सर्जनशील कार्यक्षेत्र स्थापित करू शकतील. त्यांनी सीसीजी सारख्या समुदायांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी, कॉलेज कॅम्पसचा वापर सर्जनशील कार्यक्रमांसाठी करण्याचे सुचवले. अशा उपक्रमांची ओळख वाढवण्यासाठी स्टॉल्स सेट करण्याची सूचना केली. याला प्रतिसाद देताना, श्री. दिपक यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले, विद्यार्थ्याना या वाढत्या सर्जनशील परिसंस्थेमध्ये सहभागी होण्यासाठी व त्यात योगदान देण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, सदस्यत्वाचा पर्याय सादर करण्याची शिफारस केली.
फर्स्ट फ्रायडेजच्या ८व्या आवृत्तीने, सीसीजीच्या संकेतस्थळाचे आगामी लॉन्चिंग आणि गोवा डिझाइन धोरणाच्या चालू प्रगतीसह, रोमांचक घडामोडींचा स्तर स्थापित केला आहे. हे उपक्रम गोव्याला डिझाइन, सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णतेसाठी जागतिक केंद्र म्हणून स्थान देण्यास, आवश्यक ती गती प्रदान करीत आहेत.

Trending

Exit mobile version