गोवा खबर : दिव्यांग सशक्तीकरण संचालनालयातर्फे कांपाल जलतरण तलावात १९ ते २२ ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय पॅरा जलतरण २०२४ स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्य दिव्यांग आयुक्त कार्यालयाच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे.
१९ रोजी पॅरा जलतरणपटूंचे वर्गीकरण सकाळी ८ ते संध्या ५.३० वाजेपर्यंत होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते २० ऑक्टोबर २०२४ रोजी क्रीडामंत्री गोविंद गावडे, दिव्यांग व्यक्तीं सशक्तीकरणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.
या स्पर्धेचा समारोप समारंभ २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडा मंत्री गोविंद गावडे, सार्वजनिक सशक्तीकरण मंत्री सुभाष फळदेसाई कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.