गोवा खबर

वाहन लोकेशन ट्रॅकिंग उपकरण बसविण्याचे सार्वजनिक सेवा वाहनांना आदेश

Published

on

Spread the love

गोवा खबर : वाहतूक संचालनालयाने  सर्व सार्वजनिक सेवा वाहनांना वाहनाचे लोकेशन ट्रॅकिंग करणारे उपकरण आणि एक किंवा अधिक एमर्जन्सी बटन बसविण्याचे आदेश दिले आहेत.

सार्वजनिक सेवा वाहनांचे मालक, ऑपरेटर कोणत्याही विक्रेत्यांकडून वाहन लोकेशन ट्रॅकिंग  उपकरण आणि एमर्जन्सी बटन खरेदी करू शकतात, परंतु उपकरण आणि बटन एआयएस-१४० दर्जाचे असले पाहिजे.

वाहन लोकेशन ट्रॅकिंग  उपकरण उत्पादक/ओईएम विक्रेत्यांनी सार्वजनिक सेवा वाहनांमध्ये उपकरण बसवून वाहन पोर्टलवर वाहनाच्या क्रमांकासह उपकरणाची माहिती अपडेट करावी.

उपकरण आणि बटन बसविण्यासाठी आणि दुरूस्त करण्यास  ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत वेळ दिलेली आहे आणि त्यानंतर फिटनेस तपासणीच्या वेळी उपकरण आणि बटनांची तपासणी करण्यात येईल.

 

Trending

Exit mobile version