गोवा खबर : तियात्र अकादमीने वास्को येथील रविंद्र भवनाच्या सहकार्याने वास्को रविंद्र भवनात २३ ते २८ सप्टेंबरपर्यंत दुसरी अखिल गोवा तियात्र स्पर्धेचे आयोजन केले होते.
स्पर्धेचे उद्घाटन २३ सप्टेंबर २०२४ रोजी कला आणि संस्कृती संचालक आणि तियात्र अकादमीचे अध्यक्ष सगुण वेळीप आणि रवींद्र भवन बायणा वास्कोचे अध्यक्ष जयंत जाधव, उपाध्यक्ष धर्मेंद्र प्रभुदेसाई आणि रोझरी हायस्कूल, कुजिरा, बांबोळी गोवाच्या मुख्याध्यापिका ॲलिस जोन गोस याही उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
कला व संस्कृती संचालक सगुण वेळीप यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रवींद्र भवन, वास्कोचे अध्यक्ष जयंत जाधव यांचेही यावेळी भाषण झाले. स्पर्धेत सहा माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. रोझरी हायस्कूल, कुजिरा, बांबोळी यांनी ‘काळोखी वाट’ स्पर्धेचा पहिला तियात्र सादर केला.
वेळ्ळी येथील सेंट झेवियर हायस्कूलने तियात्र ‘डिस्टिंक्शन’साठी प्रथम पारितोषिक प्राप्त केले. अवर लेडी ऑफ कार्मेल हायस्कूल, कुडतरीने तियात्र बी तशे भातसाठी दुसरे पारितोषिक प्राप्त केले. आणि तिसरे पारितोषिक अवर लेडी ऑफ द रोझरी हायस्कूल, दोना पावला यांनी तियात्र तुका जाय झाल्यारसाठी पटकाविले.
स्पर्धेचे परीक्षक एकनाथ महाले आणि मॅक्सी परेरा हे होते. तर आभार गोवा तियात्र अकादमीचे सदस्य सचिव सुरेश दिवकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तियात्र अकादमीचे सांस्कृतिक संघटक डॉ. विजया तारी यांनी केले.