गोवा खबर

भाजपचे गिरिराज लढाई हरले, बचावासाठी कुबड्यांचा वापर:  अमरनाथ पणजीकर

Published

on

Spread the love
गोवा खबर: भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर पराभूत झाले असून त्यांच्याकडे भाजपचा बचाव करण्यासाठी कोणतीही ठोस भुमिका नाही, म्हणून ते हिंदु संघटनेचे कार्ड वापरत आहेत, अशी टीका काँग्रेसचे मिडिया अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी गुरुवारी केली.
‘‘आमचे नेते युरी आलेमाव यांनी हिंदु संघटनांच्या विरोधात काहीही म्हटलेले नाही. भाजपचे नेते जेव्हा असामाजिक घटकांना आश्रय देतात आणि जनतेच्या रोषाला आमंत्रण देतात तेव्हा त्यांचा डीएनए गोंधळून जातो, तेव्हा ते आरएसएसच्या कुबड्यांचा वापर करतात. दुसरं म्हणजे आम्ही नथुराम गोडसेच्या नव्हे, तर राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारधारेचं अनुसरण करतो,’’ असं पणजीकर म्हणाले.
‘‘गिरिराज वेर्णेकर यांचा पराभव झाला आहे. जमीन रूपांतरण, डोंगर कापणी आणि इतर भ्रश्टाचारावर भाजपचा बचाव करण्यासाठी त्यांच्याकडे काहिच उरलेले नाही. भाजपच्या आघाडय़ांनी निर्माण केलेला जातीय तेढ याच्यावर त्यांच्याकडे उत्तर नाही. स्मार्ट पणजीच्या घोटाळ्यांनी गिरीराजांचे तोंड बंद केले आहे. त्यामुळे आमच्या विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यावर खोटी विधाने करण्यात त्यांना आनंद वाटतो,’’ असे पणजीकर म्हणाले.
‘‘गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपने मोठ्या प्रमाणावर जमिनीचे रूपांतरण केले आहे, राज्याची मालमत्ता भांडवलदारांना विकली, कला अकादमीतील भ्रष्टाचार, नोकरी विक्री, कायदा व सुव्यवस्था ढासळणे, बेरोजगारी, मिशन टोटल कमिशन, रस्ते अपघात, रस्त्यावरील खड्डे अशा अनेक मुद्द्यांवर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  त्यामुळे गोंधळलेल्या भाजपने आरएसएसच्या कुबड्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे,’ अशी टीका पणजीकर यांनी केली.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यावर आरोप करण्याऐवजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इतर धर्माविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई करण्याचा शब्द पाळला पाहिजे, याकडे पणजीकर यांनी लक्ष वेधले.
‘‘सुभाष वेलिंगकर यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस मुख्यमंत्री दाखवणार? नाही! कारण जर त्यांनी कुबड्यांवर कारवाई केली तर ते कसे उभे राहतील?,’’ असा सवाल त्यांनी केला.
‘‘गोव्याची जनता शहाणी आहे आणि त्यांना माहित आहे की भाजपने आपले सुंदर राज्य कसे उद्ध्वस्त केले आहे. आता ते त्यांच्या राजकीय डावपेचांना आणि मुद्द्यांना बळी पडणार नाहीत. आमचे आणि इतर विरोधी पक्षांचे मतदार आणि समर्थक हिंदू आहेत, त्यामुळे हिंदू संघटनांना दुखावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण आमच्यात आणि भाजपमध्ये फरक आहे, आम्ही राजकीय लाभ मिळवण्यासाठी धर्माचे कार्ड वापरत नाही, असे पणजीकर म्हणाले.
भ्रश्टाचार आणि इतर गोष्टींतून स्वताला संरक्षीत करण्यासाठी भाजप आपल्या डीएनएच्या सवई प्रमाणे कोणत्याही चुकीच्या गोष्टीचा पर्याय निवडण्याची मुभा देतो, ज्याचा वापर गिरीराज पै वेर्णेकर करत आहेत. मात्र, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी देशभरात प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या डावपेचांना बळी पडू नका, असे आवाहन पणजीकर यांनी जनतेला केले आहे.

Trending

Exit mobile version