गोवा खबर

मुख्यमंत्र्यांची गांधीजींना आदरांजली

Published

on

Spread the love

गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेच्यावतीने  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या १५५ व्या  जयंतीनिमित्त जुने गोवा येथील गांधी चौक येथील गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहली.   

 स्थानिक आमदार राजेश फळदेसाई, से ओल्ड गोवा पंचायतीच्या सरपंच श्रीमती. मेधा एम. पर्वतकर, जिल्हा पंचायत सदस्य श्री सिद्धेश एस. नाईक , राज्य मुख्य माहिती आयुक्त श्री अरविंद नायर, राज्य माहिती आयुक्त श्री आत्माराम बर्वे आणि इतरांनी या महान नेत्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

 शांतता आणि अहिंसेचा संदेश  देणाऱ्या  महात्मा  गांधींनी  केवळ भारताला ब्रिटीशांच्या वर्चस्वातून मुक्त करण्यावर लक्ष केंद्रित केले नाही तर स्वच्छतेबाबत जनजागृती करून हाच एकमेव धर्म आहे असा संदेश देण्याचे काम केले.  भारताचे पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ भारत मिशन सुरू केले आहे असे सांगून भारत स्वच्छ करण्यासाठी देशभरातील सर्व वयोगटातील लोकांना समाविष्ट केले आहे. त्यांच्या या प्रयत्नाला आता दहा वर्षे पूर्ण झाली आहेत असे ते म्हणाले.

   पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी एक चांगले राष्ट्र निर्माण करण्यासाठी महात्मा गांधींनी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा  आणि कोणीही सरकारच्या सेवेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणारे “अंतोदय तत्व” हे तत्वज्ञान स्वीकारले. हे पाऊल पुढे टाकत भारताच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मिशनच्या माध्यमातून या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि  समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत  पाणी, विमा, घर, रस्ते अशा प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकार स्वयंपूर्ण गोवा मिशनच्या माध्यमातून गोव्यातील प्रत्येक गाव आणि शहर आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे . सर्व तरुणांना कुशल बनविण्यासाठी कौशल्य, पुनर्कुशलीकरण आणि अपस्किलिंगच्या माध्यमातून कुशल शिक्षणाला महत्त्व दिले जात आहे असे ते म्हणाले.

 ‘खादी’ वापरण्याच्या महात्मा गांधींच्या आणखी एका मिशनचे स्मरण करून मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी मिशन व्होकल फॉर लोकल अंतर्गत आपणही स्थानिक उत्पादन वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले . मेक इन इंडिया आणि मेड इन इंडियावर आमचे लक्ष भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देईल. भारताच्या पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मिशनला महत्त्व देण्यासोबतच देशाच्या विकासासाठी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्ट-अप इंडिया, फिट इंडिया इत्यादी विविध पैलूंवर लक्ष केंद्रित केले असे ते म्हणाले.

       धार्मिक नेते श्री गजेंद्र खेडेकर , फादर पॅट्रिसियो फर्नांडिस आणि हजरत मौलाना महंमद रफिक यांनी भगवद्गीता, बायबल आणि कुराणमधील श्लोकांचे पठण केले.

       याप्रसंगी कला अकादमीच्या गायक गटाने भजने गायिली. से ओल्ड गोव्याच्या सरपंच श्रीमती. मेधा एम. पर्वतकर यांनी स्वागत केले तर श्री प्रदिप नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

   तद्नंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, श्री राजेश फळदेसाई, श्रीमती. मेधा एम. पर्वतकर, श्री सिद्धेश एस. आणि इतर मान्यवरांनी पंचायत आवारात भारताचे माजी पंतप्रधान, स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यासाठी से ओल्ड गोवा ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून पुष्पांजली अर्पण केली.

Trending

Exit mobile version