गोवा खबर

महात्मा गांधी नेहमीच त्यांच्या सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांवर ठाम राहिले:राज्यपाल

Published

on

Spread the love

 गोवा खबर:राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांनी महात्मा गांधी नेहमीच त्यांच्या सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांवर ठाम राहिले आहेत असे सांगितले. त्यांनी स्वच्छता आणि मन आणि आत्म्याची शुद्धता हे जीवनाचे उच्च गुण मानले आहेत. आज राजभवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गांधी जयंतीनिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या आणि गांधीवादी विचारसरणीने संस्था आणि पद्धतींच्या निर्मितीला आकार दिला. राज्यपालानी  पुढे बोलताना गांधीजींनी या विचारधारा विविध प्रेरणादायी स्त्रोतांमधून विकसित केल्या त्यापैकी एक म्हणजे भगवद् गीता असे त्यांनी सांगितले. राज्यपालांनी गांधीजींबद्दल एक घटना सांगितली, एका पत्रकाराने महात्मा गांधीजींना भारतातील लोकांना संदेश देण्यास सांगितले, गांधीजींनी उत्तर दिले “माझे जीवन हाच माझा संदेश आहे”. महात्मा गांधीजींनी आपल्या जीवनाचे तत्त्वज्ञान या चिंतनीय शब्दांत मांडले असे ते म्हणाले.

महात्मा गांधींचे जीवन आणि तत्त्वे यांनी सर्व वयोगटातील जीवनाला प्रेरणा दिली आहे असे राज्यपाल म्हणाले. महात्मा गांधींनी घालून दिलेल्या तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

सुरवातीस राज्यपाल, गोव्याच्या प्रथम महिला श्रीमती. रीता श्रीधरन पिल्लई आणि इतर मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी राज्यपालांचे सचिव श्री एमआरएम राव, आयएएस उपस्थित होते.

श्री. ज्ञानेश्वर पाटील, हिंदू विद्वान, मौलाना मोहम्मद इरफान रझा आणि फादर फ्रान्सिस अकारा ओपी यांनी महात्मा गांधीजींच्या जीवन आणि कार्यावर भाषण केले आणि प्रार्थना केली.

श्रीमती. सम्राद्नी आयर आणि कला अकादमीच्या भजन पथकाने भजन सादर केले.

राष्ट्रपित्यांना आदरांजली म्हणून गांधी जयंती स्वच्छ भारत दिवस म्हणून पाळली. स्वच्छ भारत अभियानात राज्यपाल आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते.

Trending

Exit mobile version