गोवा खबर

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी आणि उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी गरब्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश द्या ! : हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

Published

on

Spread the love

गोवा खबर:नवरात्री हा श्री आदिशक्तीच्या उपासनेचामांगल्याचा आणि पावित्र्याचा सण आहेपण आज देशभरात वाढत असलेले महिलांवरील अत्याचारलाखोंच्या संख्येने महिला बेपत्ता होणे, ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदू युवतींना लक्ष्य करणे आदी अनेक प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेतत्यामुळे नवरात्रोत्सवामध्ये लव्ह जिहाद्यांपासून महिलांची सुरक्षिततातसेच उत्सवांचे पावित्र्य जपणे आवश्यक आहेम्हणूनच ज्यांना मूर्तीपूजा मान्य नाहीअशांना नवरात्रीमध्ये देवीच्या मूर्तीसमोर गरबा खेळण्यासाठी प्रवेश देऊ नयेगरबा हा हिंदूंचा धार्मिक सण आहेहिंदू देवतांवर श्रद्धा असणार्‍यांनीच तेथे यावेजे मूर्तीपूजा न मानणारे गरब्यात शिरण्याचा प्रयत्न करतातत्यातून पुढे ‘लव्ह जिहाद’चा धोकाही निर्माण होण्याची शक्यता आहेत्यामुळे ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी आणि उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी गरब्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश द्यावाअसे आवाहन हिंदु जनजागृती समितीने नवरात्रीनिमित्त गरबा आयोजन करणार्‍या सर्व आयोजकांना केले आहे.

       या संदर्भात गुजरातमध्यप्रदेश राज्यांसह महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यांतील पोलिसांनी महिलांची सुरक्षेसाठी प्रत्येकाचे आधारकार्ड पाहून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहेत्याचे आम्ही मनापासून स्वागत करतोमात्र हा नियम केवळ काही राज्ये वा जिल्ह्यांत नव्हेतर संपूर्ण देशभरात लागू केला पाहिजेआज देशभरात बेकायदेशीररित्या घुसखोरी केलेल्या बांगलादेशी आणि रोहिग्या मुसलमानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहेया घुसखोरांचा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचे सुरक्षा यंत्रणांना आढळून आले आहेहे अतिशय गंभीर असून नवरात्रोत्सवामध्ये काही घातपात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होऊ शकतोत्यामुळे गरबा आयोजकांनी हा विषय गंभीरतेने घ्यायला हवा.

      ज्या अहिंदूंना नवरात्रीमध्ये गरब्यात सहभागी व्हायचे असेलतर प्रथम श्रद्धेने विधीवत प्रथम हिंदु धर्म स्वीकारावाहिंदु देवतांची पूजाअर्जा करावीतिलकधारण करून मग गरबोत्सवात सामील व्हावेएरवी गणेशोत्सवरामनवमी आदींच्या मिरवणुका निघतातत्या वेळी चुकून अंगावर गुलाल पडला किंवा मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर्स लावले अशा कारणांमुळे दंगली घडवणारे नवरात्रीच्या गरब्यात आनंदाने कसे काय सहभागी होतातहा प्रश्न निर्माण होतोत्यामुळे कोणत्या हेतूने अहिंदु गरब्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतातहे महत्त्वाचे आहेयाकडेही समितीने लक्ष वेधले.

     नवरात्री म्हणजे नऊ दिवस देवीची भक्तीभावाने करायचे व्रत असून त्याचे पावित्र्य जपणे आवश्यक आहेसध्या नवरात्रीमध्ये चित्रपटांतील अश्लील गाणी लावणेत्यांवर हिडीसपणे नाचणेमहिलांची छेडछाड करणेतोकडे कपडे घालून गरब्यात सहभागी होणे आदी प्रकार होतातयांतून महिलांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकतेत्यामुळे हे आपण टाळले पाहिजेतसेच उत्सवांचे बाजारीकरण राेखण्यासाठीही प्रयत्न करायला हवेतअसेही समितीने म्हटले आहे.

Trending

Exit mobile version