गोवा खबर

काजू उद्योगासाठी रोजगार अनुदान योजनेची दुरूस्ती

Published

on

Spread the love

गोवा खबर:उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाने काजू उद्योगाची वाढ करणे आणि टिकाव धरण्यासाठी  विद्यमान ‘काजू प्रक्रिया उद्योगासाठी रोजगार अनुदान योजना’ २०२२ मध्ये सुधारणा केली आहे. या योजनेत काजू प्रक्रिया विभागाने आपल्या गोव्यातील नियमित कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनाच्या ५०% पगाराची परतफेड करून उद्योगाला चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

नियमित रोजगाराच्या बाबतीत किमान ६ महिन्यांच्या तरतुदीऐवजी आता गोव्यातील कर्मचाऱ्यांना वर्षातून किमान १२० दिवस रोजगार देणारे सर्व काजू प्रक्रिया उध्योग या योजनेसाठी पात्र असतील. याशिवाय, जे कर्मचारी एका महिन्यात किमान १२ दिवस किमान ८ महिन्यासाठी हजेरी पटावर उपस्थित असतील ते अनुदानासाठी पात्र मानले जातील.

उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाने गोव्यातील सर्व काजू प्रक्रिया करणाऱ्या घटकांना योजनेअंतर्गत लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

कॅलेंडर वर्षाचे दावे म्हणजे जानेवारी ते डिसेंबर या कालावधीतील दावे पुढील वर्षाच्या ३१ मार्चपर्यंत  दाखल केले पाहिजे.

Trending

Exit mobile version