गोवा खबर

३० सप्टेंबर रोजी स्वर्गीय डॉ. एफएल गोम्स यांची पुण्यतिथी

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा सरकार ३० सप्टेंबर रोजी स्व. डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांची पुण्यतिथी राज्य कार्यक्रम म्हणून साजरी करणार आहे.

३० सप्टेंबर २०२४ रोजी दोन ठिकाणी कोमुनिदाद इमारतीजवळ, मडगाव येथे सकाळी ९.१५ वाजता आणि डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स मेमोरियल ट्रस्ट, नावेली सासष्टी येथे सकाळी १०.०० वाजल्यापासून समारंभ आयोजित केला आहे. कायदा आणि न्याय मंत्री श्री आलेक्स सिक्वेरा हे प्रमुख पाहुणे असतील आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री श्री लुइझिन्हो फालेरो हे सन्माननीय अतिथी असतील. नावेलीचे आमदार श्री उल्हास तुयेंकर, नावेली सरपंच श्रीमती. लुसिया कार्व्हालो आणि जि.प. सदस्य श्री एडविन कार्दोझो कार्यक्रमास उपस्थित राहतील.

Trending

Exit mobile version