गोवा खबर

रविवारी होणार ‘सपनांतल्या गांवची वाट’चे प्रकाशन

Published

on

Spread the love
गोवा खबर:प्रसिद्ध कोंकणी कवी उदय नरसिंह म्हांबरो यांच्या ‘सपनांतल्या गांवची वाट’ काव्यसंग्रहाचे रविवार, 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4.30 वाजता प्रकाशन होणार आहे. संजना पब्लिकेशन्स व गोवा कोंकणी अकादमीच्या संयुक्त विद्यमाने होत असलेला हा कार्यक्रम पाटो पणजी येथील दूरसंचार इमारतीत, पाचव्या मजल्यावर असलेल्या  गोवा कोंकणी अकादमी सभागृहात होणार आहे.
उदय म्हांबरे यांचे ‘हय सायबा’, ‘मनशाच्या सोदांत’ आणि ‘इंद्रधोणू उदेवं’ हे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘इंद्रधोणू उदेवं’ ह्या त्यांच्या काव्यसंग्रहाला विश्व कोंकणी केंद्राचा विमला पै पुरस्कार तसेच गोवा कोंकणी अकादमीचा उत्कृष्ट कवितासंग्रह 2021 चा पुरस्कार लाभला आहे. तसेच त्यांच्या ‘काळीज उसवलां’ ह्या ललित निबंधसंग्रहाला 2023 सालचा कोंकणी भाशा मंडळाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
रविवारी पणजीत होणार्‍या ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य अकादमी विजेते, प्रसिध्द कवी माधव बोरकर असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्याप्रबोधिनीचे प्राचार्य डॉ. भूषण भावे उपस्थित असणार आहेत. तर गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत सावंत आणि विमला पै पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध कवी शैलेंद्र मेहता विशेष पाहुणे म्हणून हजर असतील. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष जाण करणार आहेत.
प्रकाशन समारंभाला वाचकांनी, काव्य रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संजना पब्लिकेशन्सचे दिनेश मणेरकर यांनी केले आहे.

Trending

Exit mobile version