गोवा खबर

मिनेझिस ब्रागांझा संस्थेतर्फे १ ऑक्टोबर रोजी हिंदी सृजनोत्सव

Published

on

Spread the love

गोवा खबर : मिनेझिस ब्रागांझा संस्थेतर्फे हिंदी दिनानिमित्त १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता मिनेझिस ब्रागांझा, संस्थेत गोव्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषेतील विविध स्पर्धा अर्थात भजन गायन, कविता सादरीकरण, निबंध लेखन, वक्तृत्व, रेखाटन आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या आहे.

सदर संस्था हिंदी सृजनोत्सव २०२४ मध्ये स्पर्धेतील विजेत्याची निवड करील आणि विजेत्या महाविद्यालयांना चषक, रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तसेच प्रत्येक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक बक्षिसे दिली जातील. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि हिंदी भाषेचे महत्त्व ओळखून त्यांना प्रोत्साहित करणे हा आहे. या शुभ प्रसंगी बीए आणि एमएमध्ये हिंदी भाषेत गुणवत्ता मिळविलेल्यांना गौरविण्यात येणार आहे.

१ ऑक्टोबर २०२४ रोजी या हिंदी सृजनोत्सवाचे उद्घाटन भोपाळ येथील विख्यात साहित्यिक आणि साहित्य क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व श्री. गोविंद मिश्रा यांच्याहस्ते होणार आहे. गोमंतकीय लेखक पद्मश्री विनायक खेडेकर समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील आणि गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठाच्या अध्यक्ष श्रीमती. कृष्णी के. वाळके या सन्माननीय अतिथी असतील.

मिनेझिस ब्रागांझा संस्थेने गोवा राज्यातील सर्व साहित्यिकांना १ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९.३० पासून हिंदी दिन साजरा करण्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.

अधिक माहितीसाठी ९४२१८६८३२२ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

Trending

Exit mobile version