गोवा खबर

गोव्यातही एनपीएस-वात्सल्य योजनेचा प्रारंभ

Published

on

Spread the love

गोवा खबर : केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथून एनपीएस-वात्सल्य योजनेचा प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण देशभरातील विविध 75 ठिकाणी  करण्यात आले.

सीतारामन आणि वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या हस्ते देशभरातील काही लाभार्थी विद्यार्थ्याना योजनेचे प्रमाणपत्र वितरित करून योजनेचा प्रारंभ झाला.

उत्तर गोव्यातील बांबोळी येथील डॉ. के. बी. हेडगेवार उच्च माध्यमिक शाळा आणि केशव स्मृति हायस्कूल दाबोलीम, वास्को येथील शाळेत एनपीएस वात्सल्य योजनेच्या नवी दिल्लीतील शुभारंभाच्या कार्यक्रमाचे  थेट प्रसारण करण्यात आले. यावेळी दोन्ही शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात या योजनेत नोंदणी केलेल्या लाभार्थी विद्यार्थी आणि पालकाना योजनेचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. बांबोळी इथल्या डॉ. के. बी. हेडगेवार उच्च माध्यमिक शाळेतील कार्यक्रमात भारतीय स्टेट बॅकेचे उपमहाप्रबंधक चंद्रशेखर वोहरा, सहायक महाप्रबंधक रॉडरिगज कार्लोस, नाबार्डच्या सहायक महाप्रबंधक राजश्री वानगणकर, शाळेचे प्रा. विलास सातारकर यावेळी उपस्थित होते. पालकांनी आपल्या मुलांच्या नावाची नोंदणी अधिकाधिक संख्येत या योजनेत करावी. या योजनेच्या माध्यमातून मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद होण्यास मदत होणार आहे असे भारतीय स्टेट बॅकेचे उपमहाप्रबंधक चंद्रशेखर वोहरा यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दाबोलीम, वास्को येथील केशव स्मृति शाळेत झालेल्या कार्यक्रमात जिल्हा  बँक  प्रबंधक जी. विजयमूर्ती, नाबार्डचे उपमहाप्रबंधक विश्वास कदम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राज्य स्तरीय बँक समिति द्वारे करण्यात आले होते.

Trending

Exit mobile version