गोवा खबर

‘पंतप्रधान जनआरोग्य’चा लाखो भारतीयांना लाभ : विश्वजित राणे

Published

on

Spread the love

गोवा खबर : आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेचा गोवेकरांना लाभ झाला आहे. पंतप्रधानांची ’सर्वांसाठी आरोग्य’ ही संकल्पना या योजनेद्वारे साकार झाली आहे, ज्यामुळे 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह लाखो भारतीयांसाठी उपचार आणि फायदे झाले आहेत, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

आरोग्य क्षेत्रात राज्य तसेच केंद्र सरकारच्या विविध योजना असून याचा लोकांना चांगला लाभ होत आहे. सर्व योजना, सुविधा आता सुरळीत केल्या आहेत. गरीब लोकांना या योजनांचा लाभ होत आहे. पूर्वी लाखो रुपये औषधोपचारावर खर्च करावे लागत होते. आता अशा विविध योजनांमुळे मोफत उपचार मिळू लागले आहेत, असेही राणे यांनी नमूद केले.

आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेत कौटुंबिक आकार, वय आणि लिंग निर्बंध यासारखे अडथळे दूर केले आहेत, ज्यामुळे दर्जेदार आरोग्यसेवा सर्वांना उपलब्ध झाली आहे. राज्यातील आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी, आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी आणि आमच्या लोकांचे एकंदर कल्याण करण्यासाठी ही योजना लाभदायक ठरत असल्याचे राणे यांनी सांगितले.

Trending

Exit mobile version