गोवा खबर

राणे दाम्पत्यामुळे च्यारी यांचे घराचे स्वप्न पूर्ण

Published

on

Spread the love

गोवा खबर : राणे दाम्पत्याच्या मदतीमुळे आंबेडे नगरगाव येथील ज्ञानेश्वर च्यारी यांचे घराचे स्वप्न साकार झाले. घराचे स्वप्न पूर्णत्वास नेल्याबद्दल च्यारी कुटुंबीयांनी राणे कुटुंबीयांना धन्यवाद दिले.

च्यारी यांचे घर गेल्या वर्षीच्या पावसात कोसळले होते. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ते बाजूला झोपडी बांधून राहत होते. पत्नी व दोन मुलांचे चरितार्थ, त्यांचे शिक्षण यांचा भार त्यांना पेलवत नव्हता. त्यामुळे नूतन घराचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले होते.

राणे दाम्पत्यापर्यंत त्यांची ही व्यथा पोहोचली व त्यांनी मदतकार्य केले. च्यारी यांना चिरेबंदी घर बांधून देण्यात आले आहे. नुकताच त्यांनी नवीन घरात प्रवेश करत गणपतीचे पूजनही केले. राणे कुटुंबीयांसाठी गणरायाच्या चरणी उदंड आयुष्य, आरोग्याची प्रार्थना च्यारी कुटुंबीयांनी केली.

यावर आपली प्रतिक्रिया देताना आमदार डॉ. दिव्या राणे म्हणाल्या, सत्तरीची जनता म्हणजे आमचे कुटुंबच आहे. त्यांच्या सुखदु:खात आम्ही नेहमीच सहभागी होत राहणार. लोकसेवा करण्याच्या आमच्या कार्तव्यात कोणत्याही प्रकारची कसूर आम्ही ठेवणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

Trending

Exit mobile version