गोवा खबर

प्रसाद लोलयेकर, संजित रॉड्रिग्स यांची बदली

Published

on

Spread the love

गोवा खबर : आयएएस अधिकारी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांची अंदमान निकोबार तर स्मार्ट सिटी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजित रॉड्रिग्स यांची लडाखला बदली करण्यात आली आहे. त्याशिवाय प्रसन्ना आचार्य यांची मिझोरामहून गोव्यात बदली करण्यात आली आहे.

अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहेत. प्रसाद लोलयेकर यांची अंदमान निकोबार, संजित रॉड्रिग्स लडाखमध्ये, तर मिझोराममध्ये सेवा बजावत असलेले प्रसन्ना आचार्य यांची गोव्यात बदली झाली आहे. तसेच वर्षा शर्मा, अजय कृष्णा शर्मा यांच्यासह राजेंद्र कुमार शर्मा व औदेश कुमार शर्मा या अधिकार्‍यांची गोव्यात बदली झाली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये सेवा बजावत असलेले गोव्याचे स्वप्नील नाईक यांची चंदीगड येथे बदली झाली आहे.

Trending

Exit mobile version