गोवा खबर

‘स्मार्ट सिटी’ घोटाळा प्रकरणात चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

Published

on

Spread the love

गोवा खबर : इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्वयंदीप्त पाल चौधरी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पुराव्यांचे दस्तावेज भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे (एसीबी) आहे.

स्मार्ट सिटीच्या कामात 82.87 लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी चौधरी याच्यांविरुद्धच्या एसीबीच्या तपासाने गती घेतली आहे. ऑडिट अहवालाच्या आधारावर त्याच्याविरुद्ध आयएएस अधिकारी मामू हागे यांनी एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर जुलै महिन्यात एसीबीकडून या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

तक्रारीसोबत जोडला गेलेला ऑडीट अहवालही एसीबीला सादर झाला आहे. तसेच इतर कागदपत्रेही एसीबीकडून मिळवण्यात आली आहेत. तूर्त या प्रकरणात कागदपत्रांची तपासणी सुरू असून ही कागदपत्रे चौधरी यांच्या विरुद्ध ठोस पुरावे ठरत आहेत. त्यामुळे चौधरी यांना चौकशीसाठी समन्स वगैरे पाठवण्याची एसीबीला गरज नाही आहे. गरज पडेल तेव्हा त्यांनाही समन्स बजावले जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या पणजी स्मार्ट सिटी घोटाळ्यात स्वयंदीप्त पाल चौधरी यांच्याविरोधात पहिला एफआयआर नोंद केल्याने या प्रकरणाची सीबीआय किंवा निवृत्त न्यायाधिशांकडून सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

Trending

Exit mobile version