गोवा खबर

‘ती’ जाहिरात मागे न घेतल्यास कारवाईचा इशारा

Published

on

Spread the love

गोवा खबर : डेल्ली रुलर्स ऑफ गोवा नाऊ काँकर गोवा’ अशी जाहिरात प्रसिद्ध करणार्‍या अभिनंदन लोधा समूहाला गृहखात्याकडून नोटीस बजावण्यात आली आहे. जाहिरात मागे घ्या अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा देण्यात आला आहे.

अभिनंदन हाऊस उद्योग समूहाची ही वादग्रस्त जाहिरात चर्चेचा विषय बनली होती. सोशल मीडियावरही ही जाहिरात व्हायरल झाली होती. त्याविरुद्ध अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. शेवटी या तक्रारींची दखल घेण्यात आली.

गृहखात्याच्या अवर सचिवांच्या स्वाक्षरीने बजावलेल्या या नोटिशीत समूहाच्या या जाहिरातीमुळे गोवेकरांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे म्हटले आहे. ही जाहिरात ताबडतोब मागे घ्यावी, असा आदेशही देण्यात आला आहे. तसे न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या उद्योग समूहाच्या बायंगिणी येथील प्रकल्पाच्या व्यवस्थापकाला ही नोटीस बजावण्यात आली आहे.

Trending

Exit mobile version