गोवा खबर : रुग्णालये आणि शाळांमध्ये डिजिटल न्यूरोपॅथी स्क्रिनर आणि डिजिटल स्टेथोस्कोप उपलब्ध करून राज्यात आरोग्यसेवेत मोठी भर घातली आहे. अशा प्रकारची उपकरणे मधुमेह आणि हृदय व फुप्फुसाच्या आजारांविरुद्धच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलतात, असे मत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केले.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आधुनिक सुविधा तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे ते म्हणाले.
आरोग्यसुविधांमध्ये अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. विविध उपकरणे वापरून अनेक रुग्णांना याचा लाभ होत आहे. चांगली आरोग्यसेवा लोकांना मिळावी, हा त्यामागचा हेतू असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.