गोवा खबर : कझान, रशिया येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोमंतकीय फिल्ममेकर साईनाथ उस्कईकर यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या ‘फुटप्रिंट ऑफ दी रोड’ या लघुपटाला विशेष पुरस्कार देण्यात आला.
6 वर्षांचा मुलगा उन्हाळी सुटीमध्ये आपल्या आईसाठी द्यायला भेटवस्तू खरेदी करण्यास गावातून शहरात जातो, पहिल्यांदाच त्याचा हा प्रवास असतो आणि या प्रवासादरम्यानचे त्याचे अनुभव, भावना या लघुपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. फुटप्रिंट ऑफ दी रोड या लघुपटासाठी कझान, रशिया येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खास पारितोषिक मिळालेच आहे, परंतु हा लघुपट यंदा रशियात होणार्या ब्रिक्स परिषदेदरम्यान देखील दाखविण्यात येणार आहे.
‘फुटप्रिंट ऑफ दी रोड’ हा 10 मिनिटांचा लघुपट असून, या लघुपटाच्या माध्यमातून उस्कईकर यांनी कझान येथील कौटुंबिक व्यवस्था, नीतिमूल्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
केवळ सात दिवसांच्या आत लघुपट तयार करणे, तसेच कझानमधील संस्कृती यात प्रामुख्याने दाखविणे अशी अट तेथील सरकारने ठेवली होती. साईनाथ उस्कईकर यांनी यापूर्वी सुमारे सहा चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यात वास्रो, कोनसो, गुंतता ह्यदय हे, गोठो (डॉक्यूमेंटरी) यांचा समावेश आहे. राज्यातील चित्रपट सृष्ठीतील मान्यवरांकडून कौतूक होते आहे.