गोवा खबर

पावसाने मोडला 63 वर्षांचा विक्रम

Published

on

Spread the love

आणखी काही दिवस यलो अलर्ट

गोवा खबर : मान्सूनने यंदा गेल्या 63 वर्षांचा विक्रम मोडला. राज्यात 1 जूनपासून 8 सप्टेंबरपर्यंत सरासरी 160.46 इंच पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी 1961 मध्ये मान्सूनने 160 इंचाचा आकडा पार केला होता. त्यानंतर 2020 मध्ये सुमारे 160 इंचापर्यंत पाऊस पडला होता. पण यंदा दोन्ही विक्रम पावसाने मोडले आहेत.

Chowgule Industries Pvt Ltd. तर्फे गोमंतकीयांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!!!

गणेश चतुर्थी सुरू असताना सातत्याने पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भक्तांच्या उत्साहावर परिणाम झाल्याचे दिसून येते. आगामी काही दिवस पाऊस सुरू असल्याचे हवामान खात्याने कळवले आहे. पुढील काही दिवसांसाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.

यावर्षी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत सर्वाधिक पावसाचा जुना विक्रम मोडीत काढला होता.

Trending

Exit mobile version