गोवा खबर

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Published

on

Spread the love

 

गोवा खबर: गोव्याचे राज्यपाल श्री पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, गणेश चतुर्थी हा आपल्या देशातील एक महत्त्वाचा सण असून धर्म, जात, पात बाजुला सारून सर्व नागरिक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा सण साजरा करतात. श्री गणेश हे हिंदू देवतातील सर्वात पूज्य देवतांपैकी एक असून त्याना विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते. श्रीगणेश   “विघ्नहर्ता” म्हणजे सर्व अडचणी दूर करणारा आणि यश आणि समृध्दीचे दैवत आहे.

गोव्यातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे गणेश चतुर्थी हा सण ‘चवथ’ म्हणून ओळखला जातो. या उत्सवाची तयारी महिनाभर आधीच सुरू होते. गणेश चतुर्थीच्या सणाच्या निमित्ताने कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी करतात. घरोघरी गणेशमूर्ती बसवून उत्सवाची सुरुवात होते. देवाला घरी आणण्यापूर्वी आणि वेदीवर ठेवण्यापूर्वी कुटुंबे फुले, हंगामी भाज्या आणि फळांनी सजलेली “माटोळी” लावून खोली सजवितात. घरातील महिला गणपतीच्या आवडीचे मोदक तयार करतात.

      गणेश चतुर्थीचा उत्सव संपूर्ण देशभरात आनंदाची उधळण करतो आणि सामाजिक सलोखा आणि परस्पर सामंजस्याने लोकांना एकत्र आणतो.       या शुभ प्रसंगी, भगवान गणेश सर्वांना शांतता, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

Trending

Exit mobile version