गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील लोकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉप्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, गणेश चतुर्थीला गोव्यात पारंपारिकपणे "चोवथ" म्हणून ओळखले जाते. एकता, शांतता आणि समृद्धीचे प्रतीक असलेला गणेशोत्सव आनंददायी आणि भरभराटीचा जावो अशी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात सणाचे महत्व प्रतिपादलेगणपती बाप्पा हे सर्वात लोकप्रिय दैवत असून गणेश मुर्तीच्या आगमनाने आपल्या घरांमध्ये नवीन आशा आणि आनंद घेऊन येतो.

चवथ हा आपल्या सर्वांसाठी एक पवित्र सण आहे जो कुटुंब आणि नातेवाईकांना भगवान गणेशाची पूजा करण्यासाठी एकत्र आणतो आणि सणाचा उत्सव पारंपारिक विधी आणि संस्कृतीसह साजरा करतात. कुटुंबांचे हे पुनर्मिलन एकता, सामाजिक सौहार्द आणि संस्कृतीबद्दल आदर या मूल्यांना प्रोत्साहन देतो आणि आनंददायी वातावरण निर्माण करतो, त्यांनी या उत्सवादरम्यान निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या महत्त्वावरही भर दिला.
मुख्यमंत्र्यांनी स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाद्वारे वोकल फॉर लोकलव्दारे प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारच्या पुढाकाराचा विशेष उल्लेख केला, ज्यामध्ये गोवा बाजार, फळार आणि माटोळीच्या वस्तूंसह पारंपारिक गोव्याची उत्पादने थेट ग्राहकांना उपलब्ध करून देणारे ऑनलाइन पोर्टल समाविष्ट आहे. त्यांनी स्थानिक शेतकरी आणि कारागीरांना सक्षम बनविण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला आणि नागरिकांना ताज्या आणि हाताने बनवलेल्या उत्पादनांच्या सोयीस्कर प्रवेशाचा आनंद घेताना स्थानिक आर्थिक वाढीस समर्थन देत या व्यासपीठाचा वापर करण्यास प्रोत्साहित केले.
डॉ सावंत यांनी शांतता आणि बंधुतेचा प्रसार करण्यासाठी लोकांनी हा सण भक्तिभावाने साजरा करावा आणि आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सावंत यांनी केले.

Trending

Exit mobile version