गोवा खबर

परिक्रमा 0.7 ची झाली अधिकृत घोषणा; विशेष शिबिरातून सहभागींना मार्गदर्शन

Published

on

Spread the love
गोवा खबर : राज्याचा ज्ञानमहोत्सव असलेल्या ‘परिक्रमा’च्या सातव्या आवृत्तीची नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली. फोंड्यातील राजीव कला मंदिर येथे आयोजित विशेष मागर्दशनपर शिबिरातून ही घोषणा करण्यात आली.
गोमंतकीय तरुणांच्या कलात्मक आणि बौद्धिक अभिव्यक्तीला मंच देणारा परिक्रमा ०.७ चा ‘झिरो फेस्ट’ यावेळी 1 आणि 2 फेब्रुवारी, 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या शिबिराची सुरुवात परिक्रमाचे अध्यक्ष युगांक नायक यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाली, ज्यातून परिक्रमाचा आजवरचा प्रवास आणि भविष्याचा उत्साहवर्धक वेध घेतला. तर ॲड. सुरेल तिळवे यांनी यावेळी जैवविविधतेवर प्रकाशझोत टाकणाऱ्या आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून उपस्थितांना सखोल चिंतन करण्यास प्रवृत्त केले.
यावेळी परिक्रमा ०.७ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाबद्दल तपशीलवार माहिती देण्यात आली. प्रसिद्ध दिग्दर्शक जितेंद्र शिकेरकर यांनी यातील माहितीपट स्पर्धेबद्दल उपस्थिताना योग्य ते मार्गदर्शन करताना, या माध्यमाची नेमकी हाताळणी कशी करायची हे उलगड़ून सांगितले, तर डॉ. हेमंत अय्या यांनी संशोधन प्रक्रियेचे महत्व नमूद करत त्याबद्दल माहिती दिली.
हेरंब नाईक यांनी इन्फोग्राफिक्सच्या कलेवर अभ्यासपूर्ण सादरीकरण केले आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. उदय च्यारी यांनी उपस्थितांमध्ये कथाकथन, सर्जनशील अभिव्यक्ती आणि कथन कौशल्यांना चालना देण्यासाठी संवादात्मक कार्यशाळा घेतली.

Trending

Exit mobile version