गोवा खबर : हिंदू रक्षा महाआघाडीने आपल्या ‘सांखवाळ श्री विजयादुर्गा वारसास्थळ-मुक्ती जागरण मोहिमेचा’ शुभारंभ केला. यावेळी उपस्थित राहिलेले केरी फोंडाच्या विजयादुर्गा मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनाही काही जागरण पुस्तिका सुपुर्द करण्यात आल्या.
याप्रसंगी हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर, सहनिमंत्रक नितीन फळदेसाई, राज्य सहसंघचालक प्रा. प्रवीण नेसवणकर, कार्यवाह संदीप पाळणी, सहकार्यवाह श्रीगणेश गावडे, कोषाध्यक्ष सूर्यकांत गावस, मध्य गोवा प्रमुख श्रीराम पालकर, हिंदू जनजागृती समितीचे मंदिर समिती अध्यक्ष राजेंद्र देसाई यांच्याकडे जागरण पुस्तिका सुपूर्द करताना सुभाष वेलिंगकर व नितीन फळदेसाई, सोबत सूर्यकांत गावस, प्रविण नेसवणकर श्रीगणेश गावडे, संदीप पाळणी, श्रीराम पालकर व सत्यविजय नाईक.
सत्यविजय नाईक उपस्थित होते.
पुरातत्त्व खात्याने १९८३ मध्ये सांखवाळ येथील उद्ध्वस्त प्राचीन श्री विजयादुर्गा मंदिराची मूळ जागा ‘फ्रेंटिसपीस’ संरक्षित वारसास्थळ म्हणून ताब्यात घेतली होती. वस्तुस्थिती राज्यभर कळावी म्हणून पहिल्या टप्प्यात, १० हजार पुस्तिकांचे वितरण करण्यात येऊन मोहिमेची सुरुवात करण्यात येणार आहे. याप्रकरणी गरज भासल्यास न्यायालयाची दारेही ठोठावण्याचा निर्णयही हिंदू रक्षा महाआघाडीने यावेळी घेतलेला आहे.
आतापर्यंत गेली १० वर्षे या भू- बळकाव प्रकरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेल्या गोवा सरकारवर जनशक्ती दडपण आणण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. देशात जशी अयोध्या, तितकाच महत्त्वाचा हा मुद्दा गोव्यात उचलून धरणार असल्याचे हिंदू रक्षा महाआघाडीने या मोहिमे दरम्यान जाहीर केले आहे.