गोवा खबर

पॅरालिम्पिक : भालाफेकीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमित अंतिलचे केले अभिनंदन

Published

on

Spread the love

गोवा खबर : फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रीडापटू सुमित अंतिलचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले, सुमितची असामान्य कामगिरी! पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन! सुमितने उत्कृष्ट सातत्य आणि कामगिरीचे प्रदर्शन केले. भविष्यातील कामगिरीसाठी सुमितला शुभेच्छा.

 

Trending

Exit mobile version